शनिवार, २६ डिसेंबर, २००९

झोप न आल्याने...रजनीगंधा!

का कुणास ठाउक, पण काही केल्या मला झोपच येत नव्हती...शनिवार असल्याने कदाचित! मग काय...विचार केला थोड्या वेळ आणि डीवीडीजच्या भाऊ-गर्दीतून "रजनीगंधा"नामक एक जुन्या पिक्चर ची सीडी शोधून काढली आणि ती लावली! अमोल पालेकर ह्या माझ्या आवडत्या नटाच्या अनेक मूवीज पैकी हा एक माझा फेवरिट मूवी. विद्या सिन्हा हीदेखिल बरयापैकी सुंदर दिसे...आताच्या so called एक्टर्स पेक्षा तरी सुंदर...आणि एक्टिंग पण ठीक-थक होती. पूर्वी स्त्रिया "स्त्रियांसारख्या" दिसायच्या हे ह्या जुने पिक्चर पहाताना जाणवते!



त्यातील "कई बार यूं ही देखा है" हे गाणे मला फार आवडते...

ह्या गाण्याचा विडियो पहा:


हे गाणे आवडले असेल तर लिरिक्स वाचा:

कई बार यूं ही देखा है
ये जो मन की सीमा रेखा है
मन तोड़ने लगता है
अन्जानी प्यास के पीछे
अन्जानी आस के पीछे
मन दौड़ने लगता है

राहों में, राहों में, जीवन की राहों में
जो खिले हैं फूल फूल मुस्कुराके
कौन सा फूल चुराके, रख लूं मन में सजाके
कई बार यूं ही देखा है ...

जानूँ न, जानूँ न, उलझन ये जानूँ न
सुलझाऊं कैसे कुछ समझ न पऊँ
किसको मीत बनाऊँ, किसकी प्रीत भुलाऊँ
कई बार यूं ही देखा है ...

गुरुवार, २४ डिसेंबर, २००९

कसाब बोलतोय - "ओलखला का मला"

कवी कुसुमाग्रजांची "ओलखला का मला..." ही कविता खुप लोकाना आवडत असेल हयात शंका नाही! त्याचे एक प्रकारचे 'विडंबन' (नक्की म्हणता येणार नाही, पण तत्सम) कविता खाली दिली आहे! "कसाब" नावाचा एक मुर्ख प्रकार जो काय चालू आहे त्याविषयी ती आहे. 'कसाब'बाबत एक इंटरेस्टिंग विचार माझ्या हर्षल नावाच्या मित्राने मांडलाय...तुम्हालाही तो आवडेल....(वाचा - कसाब बाळा ... उगी उगी)



URL: http://www.aamhimarathi.in/olakhalat-ka/

कवी कुसुमाग्रजांची "ओलखला का मला..." ही मुळ कविता अशी आहे:

ओलखलत का सर मला?
पावसामध्ये आला कोणी
कपडे होते कर्दमलेले
अन केसांवारती पाणी

क्षणभर बसला नंतर हसला
बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुनी आली
गेली घरट्यात राहून

माहेरवाशिन पोरीसारखी चार दिवस राहिली
मोकळ्या हाती जाईल कशी
बायको मात्र वाचली
बायकोला संगे घेउन सर
आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे,चिखलगाल काढतो आहे

खिशाकडे हात जाताच
हसत हसत उठला
पैसे नको सर मला
जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी
मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून
नुसते लढ म्हणा ......

सोमवार, २१ डिसेंबर, २००९

नटरंग - कल्पनेच्या पलीकडची गाणी!

गेल्याच आठवड्यात सारंगने "नटरंग" ह्या येऊ घातलेल्या पिक्चरची गाणी ऐकवली. आपल्याला तर मराठी गाणी आधीच पसंत आहेत...त्यात अजय आणि अतुल यांचं म्यूजिक म्हणजे धमालच! ज्या क्षणी मी नटरंगची गाणी ऐकली, तेव्हापासून हा ब्लोग्पोस्ट लिहिताना देखिल मी त्याच पिक्चरची गाणी ऐकतोय! संगीतातील देवांच्या ह्या निर्मितीला वंदन!!! खरचं...अप्रतिम गाणी... इतकी जीवघेणी, जबरदस्त!!!

ह्या सगळ्या गाण्यांत मला विशेष आवडलेली गाणी म्हणजे - ) नटरंग उभा , ) अप्सरा आली (नाचवेल हे तुम्हाला), ) खेळ मांडला, ) कशी मी जाऊ.

माझ्या एका हर्षल नावाच्या मित्राने ह्या नटरंग बाबत लिहिलेला लेख ह्याची इंटेंसिटी खुप स्पष्ट करतो. (वाचा) खरचं ...आता ही वेळ केवळ MP3 डाउनलोड करून गाणी ऐकण्याची नसून ओरिजिनल डिस्क विकत घेउन ऐकण्याची आहे. आमच्या मंगेशने हे प्रत्यक्ष कृतित आणून खरच छान काम केले आहे!

ह्या चित्रपटाचा प्रोमो पहा:

URL: http://www.youtube.com/watch?v=o_I8hddpGh8

रविवार, २० डिसेंबर, २००९

अरे बापरे...आज सोमवार!!!

सोमवार...म्हणजे Monday!!! शनिवार आणि रविवार आराम केल्यावर सोमवारी ऑफिसला कित्ती जड़ मनाने यावे 'लागते' ह्याची कल्पना बरयाच सु-हृदय (!) लोकानां असेलच...शुक्रवारी घरी ज्या उत्साहात माणूस घरी निघतो तेवढ्याच जड़ मनाने तो सोमवारी ऑफिसला येण्यास निघतो हे सांगायला नकोच!

तरी माझ्या सारख्या निर्व्यसनी लोकांचं ठीक आहे...पण, ज्यांची 'ख़ास रविवारची जंगी पार्टी' झालेली असेल (विशेषतः रात्रि) त्यांना "सोमवार" हा दिवस केवळ उजाड़ूच नये असेच काहीसे वाटत असेल!

रविवारी जसे सूर्य-नारायण पश्चिमेच्या दिशेने मार्ग-क्रमण करू लागतात तसे हे मन 'कुंद' व्हायला लागते...उद्यापासून तेच ऑफिस...तोच कामाचा पसारा...च्यायला, पुन्हा तेच दिवस...ह्म्म्म! बहुदा...हां विचार अनेक जण करत असतील...मी देखिल करतो...पण तो तात्पुर्ताच! कारण, सुदैवाने आवडीचे काम आयुष्यात करायला मिळाले ह्या सुखानेच, माझ्यासारखे अनेक जण, नेहमीच्या उत्साहात कामास लागतात...किमान नेक्स्ट दिवसांसाठी!

चल बाबा...कामास सुरुवात करायला हवी...आज "सोमवार" आहे!

शुक्रवार, १८ डिसेंबर, २००९

नेहमी काहीतरी लिहावसं वाटतं...

नेहमी काहीतरी लिहावसं वाटतं...तसं नेहमीच लिहित असतो, पण ते सर्व Technical आणि असचं काहीस असतं. मित्रांचे Blogs वाचून प्रकर्षाने जाणवले की मराठीतून लिखाण मी देखिल करायला हवं!

म्हणुनच आजच ठरवून लगेच श्रीगणेशा केला! अमित नान्चे नामक इसमाचे ह्या ब्लोग्चे नामकरण करण्यात मोठा हात आहे...साहजिकच त्याचे धन्यवाद...तो नको-नको म्हणत होता तरीही...अगदी प्रसिद्धि-परान्ग्मुख आहे तो!

बघुया तरी, काय काय सुचतं...आठवतं! गणपती बाप्पा मोरया!!!