रविवार, २० डिसेंबर, २००९

अरे बापरे...आज सोमवार!!!

सोमवार...म्हणजे Monday!!! शनिवार आणि रविवार आराम केल्यावर सोमवारी ऑफिसला कित्ती जड़ मनाने यावे 'लागते' ह्याची कल्पना बरयाच सु-हृदय (!) लोकानां असेलच...शुक्रवारी घरी ज्या उत्साहात माणूस घरी निघतो तेवढ्याच जड़ मनाने तो सोमवारी ऑफिसला येण्यास निघतो हे सांगायला नकोच!

तरी माझ्या सारख्या निर्व्यसनी लोकांचं ठीक आहे...पण, ज्यांची 'ख़ास रविवारची जंगी पार्टी' झालेली असेल (विशेषतः रात्रि) त्यांना "सोमवार" हा दिवस केवळ उजाड़ूच नये असेच काहीसे वाटत असेल!

रविवारी जसे सूर्य-नारायण पश्चिमेच्या दिशेने मार्ग-क्रमण करू लागतात तसे हे मन 'कुंद' व्हायला लागते...उद्यापासून तेच ऑफिस...तोच कामाचा पसारा...च्यायला, पुन्हा तेच दिवस...ह्म्म्म! बहुदा...हां विचार अनेक जण करत असतील...मी देखिल करतो...पण तो तात्पुर्ताच! कारण, सुदैवाने आवडीचे काम आयुष्यात करायला मिळाले ह्या सुखानेच, माझ्यासारखे अनेक जण, नेहमीच्या उत्साहात कामास लागतात...किमान नेक्स्ट दिवसांसाठी!

चल बाबा...कामास सुरुवात करायला हवी...आज "सोमवार" आहे!

२ टिप्पण्या:

  1. सोमवारी काम करावं लागतच्च रे!! पण जेव्हा शनिवारी आणि रविवारी सुध्दा काम करावं लागतं तेव्हा खरी "लागते!"

    उत्तर द्याहटवा
  2. हे मात्र तू एकदम १०० टक्के खरा बोललास बघ!!! अजुन जेव्हा रात्रभर काम करत ऑफिस मधे थांबावा "लागतं" तेव्हाही स्वतःचं वाईट वाटतंच की! काय करणार...आलिया भोगासी, असावी चादर! (ऑफिस मधे रहायचं असता ना...म्हणून!)...असो!!!

    उत्तर द्याहटवा